एकलव्य युवा संघटना भद्रावती तर्फे वृक्षारोपण तथा मेडिकल प्लांट कुंड्या चे वाटप
भद्रावती (ता.प्र.) - दिनांक ७ जुलै ला एकलव्य युवा संघटना भद्रावती चे सदस्य बाबुभाई सय्यद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ,एकलव्य युवा संघटनेने ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे वृक्षारोपण तथा मेडिकल प्लांट कुंड्या चे वाटप करून एक उपक्रम राबविला आहे. एकलव्य युवा संघटना भद्रावती तर्फे शहरात वेडोवेळी समाजाच्या प्रति नेहमी अग्रेसर राहून सामाजिक उपक्रम राबवित असतात. संघटनेचे अध्यक्ष प्रीतम देवतळे यांनी बाबुभाई सय्यद यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून मेडिकल प्लांट कुंड्या चे वाटप केले आहे. त्यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी वर्ग तथा अध्यक्ष प्रीतम देवतळे, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर शेख, पप्पू शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ मनीष सिंग ,संघटनेचे उपाध्यक्ष वैभव मेश्राम, बाबुभाई सय्यद, प्रशांत लांडगे, प्रफुल भोसकर ,गणेश पचारे, अभिषेक घुबडे तथा एकलव्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
