आयपीएस दिपाली मासीरकर निवडणूक आयोगाच्या संचालक..!

चंद्रपूर जिल्ह्याच्या कन्येवर राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षक पदाची जबाबदारी..! चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा - आयपीएस दिपाली मासीरकर निवडणूक आयोगाच्या संचालक

बल्लारपुर (का.प्र.) - देशात नव्या राष्ट्रपतींच्या निवडीचे मतदान सुरू असून ह्या निवडणुकीत मुळ चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील दिपाली रविचंद्र मासिरकर ह्या आयपीएस अधिकारी निवडणुकीच्या निरीक्षक पदाची मोठी जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्या ह्या कामगिरीने चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिपाली मासिरकर ह्या २००८ च्या नागालँड बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीकरिता संचालक म्हणून दिल्ली येथे त्यांची नेमणूक केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीचे निरीक्षण दीपाली मासीरकर करत आहेत. भाजपच्या नेतृत्त्वातील रालोआनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दीपाली मासीरकर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठमोळ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला राष्ट्रपती निवडणुकीत आपले कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली ही अभिमानाची बाब असल्याच्या भावना चंद्रपूरच्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. मासीरकर यांनी यापूर्वी मुंबई येथे सहाय्यक महानिरीक्षक या पदावर कार्य केले. नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी देखील त्यांनी काम केलं आहे. भारत निवडणूक आयोगात संचालक पदी नियुक्ती पूर्वी नागालँडमधील कोहिमा येथे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आता त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजपच्या नेतृत्त्वातील रालोआनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. आज होणाऱ्या निवडणुकीत भारतातील खासदार आणि आमदार मिळून ४८०० मतदार मतदान करतील. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडणार आहे. नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलै रोजी होईल. 

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.