वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके वितरण..!

संत गाडगेबाबा विद्यालय, मोहर्ली, भद्रावती येथे मान्यवरांचा सत्कार व श्री. गावतुरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पुस्तक वितरणाचा अनोखा कार्यक्रम करण्यात आला..

भद्रावती (ता.प्र.) - दिनांक 30 जुलै 2022 ला सामाजिक कार्यकर्ते "डॉ श्री राकेशजी गावतुरे सर" यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील इयत्ता 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके  वितरित करण्यात आली..! याप्रसंगी कार्यक्रमाचे  अध्यक्ष  विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री अनिल वासेकर सर उपस्थित होते . तर  प्रमुख अतिथी म्हणून डॉ श्री राकेशजी गावतुरे सर, डॉ सौ अभिलाषा गावतुरे मॅडम, डॉ समीर कदम सर, ऍड. प्रशांत सोनूले सर, सौ सुनिता कातकर, सरपंच ग्रा. पं. मोहर्ली, श्री संजयजी मोंढे माजी सरपंच, ग्रा. पं. मोहर्ली,   डॉ अजयजी गुप्ता, शाळा व्यवसस्थापन समिती सदस्य, श्री श्रीकांत शेंडे, श्री अंकुश जेंगठे, श्री मंगेश शेंडे, श्री दिलीप शेंडे, माजी विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी कार्यक्राचे अध्यक्ष श्री.वासेकर सर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधना करत यशाचे शिखर गाठावे, तसेच गावतुरे सरांचा आदर्श घ्यावा त्यांनी आपल्या जन्मदिनाच्या निमित्य सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केले हे त्यांचे औदार्य आहे असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन करून विध्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या वतीने डॉ श्री राकेशजी गावतुरे, डॉ सौ अभिलाषा गावतुरे मॅडम, सौ सुनिता कातकर, सरपंच, तसेच माजी आदर्श  विद्यार्थी श्रीकांत शेंडे. यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे संचालन  विद्यालयातील शिक्षक श्री पुप्पालवार सर यांनी तर प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक श्री कोरडे सर यांनी  व आभार प्रदर्शन सौ शेंडे मॅडम  यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच विद्यार्थी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. गावकरी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.