भद्रावती (ता.प्र.) - तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पीक विमा काढावा. तालुका कृषी अधिकारी भद्रावती यांचे शेतकरी बांधवांना आवाहन.यंदाच्या साली खरीप हंगामात शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा लागू करण्यासाठी धान, सोयाबीन, कापुस, तरू इत्यादी पिकांचा समावेश केलेला आहे.
पीक कापुस,शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी 2787.50, संरक्षित रक्कम 55,750/-, सोयाबीन- शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी 1055.00, संरक्षित रक्कम 52750/-,धान शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी - 955.00, संरक्षित रक्कम 47,750/-, तरू -शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी -736.04, संरक्षित रक्कम 36802/- एवढी असणार आहे.कर्जदार व बिगर कर्जदार इच्छुक असुन त्यासाठी लागणारे कागदपत्र हे आधार कार्ड, सातबारा, नमुना आठ अ, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रासह जवळच्या बँकेत किंवा CSC सेंटरवर जाऊन शेकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत पिक विमा काढावा.अधिक माहिती करिता तालुका कृषी अधिकारी, मडंळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी सपंर्क साधावा.