बल्लारपुर (का.प्र.) - दिनांक २१/७/२०२२ या तारखेला चंद्रपुर शहरातल्या सरकारी अस्पतालच्या परिसरामध्ये महापुरुषांच्या फोटोचा अपमान बघायला मिळाला आहे, एका झाडाच्या आजु बाजुला घाणिचे साम्राज्य पसरले असुन त्या झाडावरती इंदिरा जी गांधी व शहिद भगतसिंग या महापुरुषांचा फोटो लावण्यात आला आहे,महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या महापुरुषांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्रानांची आहुती दिली अशा थोर महापुरुषांचा फोटो घाणिचे साम्राज्य पसरलेल्या जागी लावण्यात आला असुन ही आपल्या सर्वांना अपमानास्पद व शर्मेची बाब आहे. या घटनेची माहिती शहिद भगतसिंग संस्था चे अध्यक्ष श्री सतनाम सिंग मिर्धा यांना मिळताच यांनी योग शिबीराचे अध्यक्ष लक्ष्मण जी दास हरयानी व इंजिनिअर पंकज भाऊ गुप्ता यांनी या घटनेची दखल घेत अशा थोर महापुरुषांचा फोटो लावना-यावरती कारवाई करण्याची मागनी केली आहे व भविष्यात अशि घटना पुन्हा घडु नये याकरिता शासन प्रशासनाला विनंती करन्यात आली.