मोकाट सोडलेले जनावर अगदीं रस्त्यावर जनतात..!

गडचांदुर (वि.प्र.) - स्थानीय प्रभाग क्रमांक १ चे श्री रामसेवक मोरे भाऊ या वार्डाचे नगरसेवक आणि याच वार्ड मध्ये अजुन एक नगरसेविका सौ. वांढरे मॅडम सुध्दा राहतात विशेष म्हणजे सन्माननीय नगराध्यक्षा सौ. टेकाम मॅडम यांचे वार्ड पण, शोकांतिका म्हणावी लागेल की  गडचांदूर शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्ष मॅडमच्या घराच्या मागे नगरपरिषद गडचांदूरच्या आशीर्वादाने  मोकाट सोडलेले डुकर अगदीं रस्त्यावर जनतात. लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 

लोकांच्या सामानाची, अंगणात लावलेल्या फुलझाडांची मोकाट सोडलेले डुकरे नासधूस करतात पण याची साधी दखल सुध्दा घेतली जात नाही. डुकराच्या मालकाला फोन केल्यास तो उचलायला यायला तयार नाही, म्हणजेच नगर परिषद मध्ये टेबलाच्या खालून नोटांचा बंडल दिला जातो की काय? अशी शंका निर्माण होत आहे. नगराध्यक्ष मॅडमच्या वार्डाची ही अवस्था असेल तर पूर्ण गडचंदूर मध्ये काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. असे मत आणि प्रश्नांचे संभ्रम गडचांदुरातील नागरीकात निर्माण झालेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.