जनतेच्या सेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले!

पूरपरिस्थितीमुळे बल्लारपूर शहरातील पाणी पुरवठा तीन दिवसापासून ठप्प; प्रशासनाचे दुर्लक्ष..

बल्लारपूर (का.प्र.) - संपूर्ण महाराष्ट्रसह चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाच्या संततधारेमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेत. त्यामुळे जणू नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहेत. त्यातच बल्लारपूर शहरात मागील तीन दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांच्या संकटात अधिकची भर पडली आहेत. नेमकी हि बाब लक्षात घेत, प्रभात क्रमांक - ९ येथील काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरीकांना स्वखर्चाने टँकर'च्या माध्यमातून घरोघरी पाणी पुरवठा केल्याने अडचणीत असलेल्या नागरिकांना  काहीसा दिलासा मिळाला आहेत.

जिल्ह्यासह बल्लारपूर तालुक्याला पुराणे वेढले आहेत. बल्लारपूर शहरातून वाहणारी वर्धा नदी'ला पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी, वर्धा नदी लगत असलेली पाणी पुरवठा योजना ठप्प झाली असल्यामुळे शहरात मागील तीन दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. नागरिकांसाठी पर्यायी उपाययोजना करण्याची जबाबदारी स्थानिक नगर सेवक, आणि नगर परिषद प्रशासनाची होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने याकडे सर्रास पने डोळेझाक केल्यामुळे नागरिकांना पाण्याअभावी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. नेमकी हि बाब लक्षात घेता, प्रभात क्रमांक ९ येथील स्थानिक कार्यकर्ते मनोज बेले, वैष्णवी लिचोडे, बबलू थॉमस, मुकेश मुन, दिनेश लिचोडे, या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने टँकर'च्या माध्यमातून घरोघरी जाऊन पाणीपुरवठा केला आहेत. अडचणीच्या प्रसंगी धाऊन आलेल्या या सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रभात क्रमांक- ९ च्या नागरिकांनी व्यक्त केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.