बल्लारपुर (का.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांचे धोरण 2018 अंतर्गत आयोजित महाराष्ट्र स्टार्टप यात्रा संबंधाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे आयोजित या कार्यक्रमात हा उपक्रम राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याकरिता आयोजित केला आहे या संबंधीची माहिती देण्यात आली. ही स्टार्टअप यात्रा 2 सप्टेंबर 2022 ला भद्रावती येथील नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथे दुपारी दोन वाजता येत आहे . त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वानखेडे सर तर प्रमुख अतिथी श्री चंद्रशेखर जुमडे सर , अनिल मांदाडे सर, नरेश जांभुळकर हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. "आपल्या अंगात असलेल्या कला , कौशल्याला विकसित करून रोजगाराच्या संबंधाने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे" असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अतुल गुंडावार यांनी केले , तर संचलन व आभार प्रदर्शन श्री किशोर चौधरी सर यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.