सीने दिग्दर्शक संजय जीवने, अभिनेत्री सांची जीवने,वंदना जीवने यांची उपस्थिती .. !
बल्लारपूर-चित्रपट सृष्टीचा सर्वोत्कृष्ठ दादा साहेब फाळके पुरस्कार प्राप्त ..!
बल्लारपुर (का.प्र.) - बहुचर्चित तथा बहुप्रतिक्षित चित्रपट पैदागिर या चित्रपटाचा प्रोमो बल्लारपूर येथील जयभीम चौक येथे होणार असून, चित्रपटाचे दिगदर्शक संजय जीवने,मुख्यअभिनेता गौरव अंभारे,अभिनेत्री सांची जीवने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या प्रोमो कार्यक्रमाचे आयोजन जयंती उत्सव समिती जय भिम चौक बल्लारपूर च्या वतीने केले असून रविवार दिनांक 28/08/2022 रोजी सायंकाळी 7-00 वाजता होऊ घातलेल्या कार्यक्रमात तहसीलदार मा.डॉ.कांचन जगताप, पोलीस निरीक्षक उमेश पाटील,उपमुख्यधिकरी जयवन्त काटकर,पवन भगत,पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हा अध्यक्ष एड. योगिता रायपुरे यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.पैदागिर या चित्रपटाचा प्रोमो यशस्वी करण्याससाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद फुलझेले,संयोजक नागेश रत्नपारखी,सचिव देशपाल सौदागर,कार्याध्यक्ष अश्वजित रामटेके,प्रा.राजेश ब्राम्हणे,प्रा.विनय कवाडे,नरेंद्र सोनारकर,सतीश करमनकर, प्रशांत झामरे,इत्यादी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.