देशातील यशस्वी स्टील उद्योजकांचा सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव..!

मुंबई (जगदीश काशिकर) - जागतिक अर्थ व्यवस्थेत भारत एकेकाळी अग्रस्थानी होता, जागतिक स्तरावर जीडीपी मध्ये भारताचे योगदान 24.2 टक्के होते ; आता देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर एवढी भक्कम करण्याचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदी यांचे स्वप्नं पूर्ण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, त्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे वन , सांकृतिक आणि मत्स्यव्यवसय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित स्टील युजर्स इंडस्ट्रीज् फेडरेशन (सुफी ) पारितोषिक वितरण समारंभात देशातील नामवंत उद्योजकांसमोर ते बोलत होते. ना श्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित केले आहे. आत्मनिर्भर भारताचा त्यांनी संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी गोवर्धन पर्वताप्रमाणे देशातील स्टील उद्योजकांनी योगदान देऊन पूर्ण करायचा आहे. झिरो इफेक्ट , झिरो डीफेक्ट, झिरो इंपोर्ट या त्यांनी दिलेल्या त्रिसूत्रीवर आपल्याला पुढे जायचे आहे. संरक्षण क्षेत्रात झिरो इंपोर्ट मध्ये भारताने सुरवात केली आहे ही अभिमानाची बाब आहे.नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून देशात पायाभूत सुविधा क्षेत्रात गतीने काम सुरू आहे हे मान्य करावेच लागेल. कोरोना आणि लॉकडाउन च्या काळात पायाभूत सुविधांवर 5 लाख 45 हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित होता आणि प्रत्यक्षात 5 लाख 54 हजार कोटी रुपये खर्चून प्रचंड मोठे काम उभे केले.

श्री मुनगंटीवार म्हणाले कि, देश मोठा झाला कि उद्योजक आणि प्रत्येक घटकांचे महत्व आपोआप वाढेल. केवळ "भारत माता कि जय" एवढे म्हणून चालणार नाही तर भारत मातेचा जय करण्यात माझे योगदान किती याबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन केले पाहिजे.स्वीकारलेले काम हे ईश्वरीय कार्य आहे या भावनेने केले कि उत्तुंग यश प्राप्त होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे सीईओ आशीष चव्हाण यांच्या कार्यावरून ते सिद्ध झाले आहे. बीएसई चे काम उत्तम आहे , जागतिक या स्तरावर प्रगतीची दखल घेतली जावी व ही घोडदौड कायम रहावी अश्या शुभेच्छा देखील ना श्री मुनगंटीवार यांनी दिल्या.या सोहळ्यात देशातील विविध नामवंत स्टील उद्योजकांसह बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे सी ई ओ श्री आशिष चव्हाण यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.