भद्रावती (ता.प्र.) - योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक - मित्र मंडळ व अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ सप्टेंबर रोज बुधवारला योद्धा क्लिनिक, विवेकानंद महाविद्यालयात मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम टीम चंद्रपूर यांच्या सौजन्याने रक्तदाब, मधुमेह, हिपाटायटीस बी आणि सी, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर इत्यादी आजारांवर मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अक्षयज्योत आय केअर चंद्रपूर येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अक्षयकुमार चव्हाण हेही नेत्ररोगाची मोफत तपासणी करणार आहे. तरी वरील दिवशी सकाळी ९.३० ते २ वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या मोफत सेवा शिबिराचा भद्रावती शहरातील व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन योद्धा संन्याशी मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मते, भद्रावती ग्राहक मंचाचे अध्यक्ष वामन नामपल्लीवार यांनी केले आहे.
भद्रावती येथे मोफत कर्करोग व नेत्ररोग तपासणी शिबिर २१ सप्टेंबरला..!
byChandikaexpress
-
0
