विवेकानंद महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन ..!

भद्रावती (ता.प्र.) - राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ऑल रिलिजन युथ फाऊंडेशन भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद महाविद्यालयीन परीसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. समृद्धी देशमुख यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. रक्तदान कार्यक्रमात एकूण 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, रोहित शेडामे, जिल्हा सामान्य रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथील रक्त संक्रमण अधिकारी अधिकारी, डॉ. ऋषिकेश कोल्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ. समृद्धी देशमुख, रक्त केंद्र तंत्रज्ञ राजेश पेटकर, केंद्र वैज्ञानिक अधिकारी जय पचारे, सहायक चेतन वैरागडे, रुपेश घुमे आदी मान्यवर उपस्थित होते.शिबीराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. उत्तम घोसरे, डॉ.रमेश पारेलवार, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. संगीता बांबोडे यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.