शिक्षक परिषद प्राथमिकची गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा..!

भद्रावती (ता. प्र.) - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक शाखा, भद्रावतीच्या शिष्टमंडळाने डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्येवर निवेदनासह चर्चा करण्यात आली. मंजूर वैद्यकीय देयकांची ऑफलाईन मागणी पंचायत समिती यादीनुसार जिल्हा परिषदला पाठवावी. मासिक वेतनातून होणाऱ्या विविध कपाती विहित मुदतीत जमा कराव्या. सहायक शिक्षक यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषद ला पाठविण्यात यावे. सेवापुस्तक अद्ययावत करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे. कु.अर्चना गरमडे, विलास मेश्राम, संदीप गराटे यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी वेतननिश्चिती करून थकबाकी काढण्यात यावी. विविध शैक्षणिक परवानगी प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठविण्यात यावे. संघटना समस्या निवारण सभा आयोजित करण्यात यावी. विविध प्रशिक्षणाची नोंद सेवापुस्तिकेत घेण्यात यावी. डी.सि.पि.एस. रक्कम जि.पि.एफ. मध्ये वळती करण्यात यावी. सेवापुस्तिका पडताळणीसाठी जिल्हा परिषदला पाठविण्यात यावे.वरील सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करून समस्या प्राधान्यक्रमाने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद बाळेकरमकर, कार्यवाह छत्रपती राऊत, कार्याध्यक्ष विलास खाडे, कोषाध्यक्ष सुधीर निलगिलवार, संघटनमंत्री शंकर निखाडे, तालुका उपाध्यक्ष विलास मेश्राम, सहकार्यवाह संदीप गराटे, कार्यलयीन चिटणीस सचिन जांभुळे सदस्य पंकज ढाकणे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".