ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन..!

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे आजादी का अमृत वर्ष व ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन..!

भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे आजादी का अमृत वर्ष व ग्रंथालय दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल एस लडके प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ शशिकांत  शित्रे, प्राध्यापक डॉ प्रवीणकुमार नासरे, प्राध्यापक डॉ अजय देहेगावकर, श्री किशोर भोयर व कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप प्रधान उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवराच्या स्वागताने झाली याप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी केले व त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या महापुरुषाचे योगदान त्यांचे आजच्या काळात असलेले महत्त्व पटवून दिले तसेच आजच्या डिजिटल युगात सुद्धा ग्रंथाचे व ग्रंथालयाचे विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे आहे याचा सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी ग्रंथालय विभागातर्फे विविध विषयांच्या ग्रंथांचे व पुस्तकांचे भव्य प्रदर्शन महाविद्यालयात लावण्यात आले या प्रदर्शनाला महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी भेट देऊन ग्रंथाचे निरीक्षण केले.या ग्रंथ प्रदर्शनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्राध्यापक संदीप प्रधान तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. शशिकांत शित्रे यांनी केले या प्रदर्शन कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक सचिन श्रीरामे , श्री किशोर भोयर श्री विजय मदनकर यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".