शेतात वीज पडून महिला ठार ..! पती गंभीर..!!

भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती तालुक्यातील कोंढा गावात पतिपत्नी आपल्या शेतात काम करत होते. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतात काम करीत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यु झाला.सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की वर्षा ओंकार मंगाम वय 35 कोंढा येथील राहणारी ही महिला आपल्या ठेक्याच्या शेतीमध्ये शेतात खात देत असतात अचानक पणे जोरदार वादळी पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडात सुरू असतांना अचानक अंगावर वीज कोसळली आणि ती महिला जागेच ठार झाली. यात तीचा पती देखील गंभीर झाला.त्या महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे शवविच्छेदन ला पाठविण्यात आले . पुढील तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पीएसआय अशोक बोडे करीत आहे.तीला दोन लहान मुले आहेत. या नैसर्गिक आपत्ती मुळे आलेल्या संकटाने संपूर्ण गावातील नागरिक भयभीत होऊन संपूर्ण गाव हळहळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".