जज लोया, अमित शहा आणि प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे राजकारण..!

'स्प्राऊट्स' Exclusive 

मुंबई (जगदीश काशिकर) (सहकार्य - उन्मेष गुजराथी) - गुजरात दंगल सुनावणीतील न्यायाधीश लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी. पण प्रत्यक्षात या प्रकरणाचा बाजार मांडला गेला. जज लोया प्रकरणात अमित शहा यांच्यावर संशय व्यक्त झाल्याने भाजपाला तपासात रस नाही. आणि विरोधकांनाही एक राजकीय मुद्दा या व्यतिरिक्त या प्रकरणात रस नाही. ज्यांनी हे प्रकरण कथितरित्या लावून धरले ते पत्रकार टकले ही पोटार्थी पत्रकार आहेत. त्यांनी 'जज लोया व त्यात कथितरित्या गुंतलेले अमित शहा' या प्रकरणाचा पद्धतशीरपणे 'व्यापार' मांडला आहे. त्यांनी या प्रकरणावर पुस्तकही लिहिलेले आहे, यात कित्येक बाबी वास्तवाला धरून (ऑथेंटिक ) नाहीत. या पुस्तकाची किंमत ४५० रुपये इतकी आहे, इतकेच नव्हे तर याचे सर्व हक्क टकले यांच्याकडेच आहे, यातूनच लोया यांना न्याय मिळावा हा टकले यांचा हेतू नसून, यातून पैसे उकळणे, हाच त्यांचा उद्देश दिसून येतो.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे अमित शहा यांचे कट्टर विरोधक होते. टकले व त्यांच्या वकील मंडळींना पटेल यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद पुरविण्यात येत होती, अशी सूत्रांची माहिती आहे. लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो 'घातपात' आहे, असा दावा सर्वप्रथम Outlook या प्रसिद्ध इंग्रजी मासिकाने केला होता. हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर १ वर्षांनी व लोया यांच्या मृत्यूनंतर तब्बल ४ वर्षांनी अनुराधा बियाणी यांनी टाकले यांना मुलाखत दिली. यात त्यांनी हा मृत्यू संशयास्पद आहे, असा खुलासा तपशीलवार केला, ही मुलाखत पत्रकार निरंजन टकले यांनी 'कारवान' या ऑनलाईन मासिकामध्ये प्रसिद्ध केली. त्यामुळे या बातमीवर फक्त १ दिवस जेमतेम चर्चा झाली व नंतर हे प्रकरण बाजूला पडले. यानंतर कित्येक दिवसांनी तेहसीन पूनावालासारख्या अनेक जणांनी जनहित याचिका दाखल केल्या. मुंबईतील पत्रकार बंधुराज लोणे यांनीही १० जानेवारी २०१७ रोजी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात जनहितयाचिका ( पीआयएल ) दाखल केली. यानंतर भारताच्या इतिहासात सर्वप्रथम ऐतिहासिक घटना घडली. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली व ज्युडिशिअरी कशी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करते, असे जाहीरपणे सांगितले. 

लोया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनीही हा घातपात असल्याचा तात्काळ आरोप केला. देश विदेशातील सर्वच प्रसारमाध्यमांतून तो प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर तब्बल ४ वर्षांनी टकले यांनी अनुराधा बियाणी (लोया यांची बहीण ) यांची मुलाखत प्रसिद्ध केली, यात शोध पत्रकारितेचा काहीही संबंध येत नाही. याआधी याविषयी १ वर्ष अगोदर Outlook ने याविषयी सविस्तर लिहिले होते. टकले यांनी हाच मसाला अनुराधा बियाणी यांच्या मुलाखतीतून मांडला. 'कारवान'च्या या बातमीनंतर अमित शहा यांनी टकले यांचा कसा छळ केला, असा कांगावा टकले हे वारंवार करतात, त्याचे त्यांच्याजवळ कोणतेही पुरावे नाहीत. ( वास्तविक शहा यांच्या गिनतीत टकले येतही नाहीत, हे वास्तव आहे ). भाजपच्या दबावामुळे टकले यांना कोणीही पत्रकारितेत नोकरी देत नाहीत. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे,असे ते वारंवार सांगतात. मग त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा मागील ५ वर्षांपासून उदरनिर्वाह कशावर चालतो. खरेतर त्यांना वारंवार अमेरिका व इतर देशांत वारंवार फिरण्यासाठी पैसे येतो कुठून, हा प्रश्न अनुत्तरित आहे. वास्तविक टकले यांना भाजपविरोधी गटाकडून आर्थिक रसद मिळते, याचे पुरावे पोलिसांनी व्यवस्थित इन्व्हेस्टीगेशन केल्यास त्यांना मिळतील.  या व्यवहारांचा तपास झाला तर लोयांचे दोषीही सापडतील. यासाठी प्रामाणिक तपास व्हायला हवा. मृत्यूचा बाजार बंद व्हावा आणि जज लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी, हीच 'स्प्राऊट्स'ची प्रामाणिक भूमिका आहे.  


 

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.