मॅकरून स्टुडंट अकॅडमीच्या संस्थापक अध्यक्ष,प्राचार्य आणि दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी - संजय ठाकुर यांची मागणी .!
चंद्रपुर (वि.प्र.) - दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी मॅकरून स्टूडेंट अकॅडमी वडगांव,चंद्रपूर या शाळेत शिक्षण घेत असलेली १२वी वर्गातील विद्यार्थीनी हिने आपल्या खाजगी कामाकरीता प्राचार्याला सुट्टी मागितली असता प्राचार्याने तिला सुट्टी न देता उलट अश्शील शिवीगाळ करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला.हा अपमान तिला सहन न झाल्याने त्या विद्यार्थीनी त्याच शाळेच्या पहिल्या माळे वरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यात तिला गंभीर स्वरूपाचा इजा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.सध्या तिच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असून प्रकृती चिंताजनक आहे.हा संपुर्ण संतापजनक प्रकार दाबण्याचा प्रयत्न संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांनी केला.अजूनसुद्धा या प्रकाराची कुठलीही तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नसुन संपुर्ण प्रकार बंदिस्त व्हावा या करीता शाळा व्यवस्थापनाची धडपड सुरू आहे.
परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून श्री.संजय ठाकुर यांनी सदर मुलीला न्याय मिळावा व दोषींवर कडक कार्यवाही करावी या आशयाचे निवेदन काल मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर आणि आज मा.पोलिस अधिक्षक साहेब चंद्रपूर यांना देऊन सात दिवसांच्या आत जर कार्यवाही करण्यात आली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.सदर शिष्टमंडळात श्री.प्रियदर्शन इंगळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग चंद्रपूर, श्री.सतिश मिनगुलवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती-जमाती मागासवर्गीय सेल,श्री.प्रदिप रत्नपारखी माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर,श्री.किसन अरडळे मा.ग्राम पंचायत सदस्य,श्री.प्रवीण आरपेल्ली, श्री.विजय डोर्लीकर,श्री.कुणाल ठेंगरे रा.वि.कॉ महासचिव, श्री.निखिल दुर्योधन तालुका उपाध्यक्ष रा.कॉ.पा, श्री.कार्तिक निकोडे, श्री.हिमांशू गुडघे,श्री.चिराग ठेंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.