भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत सुरु असलेल्या कै. नीलकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे प्रशासकीय सेवा करिअर मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावर चंद्रपूर येथील सी टी पी एस औष्णिक केंद्रातील कार्यकारी कार्यकारी अभियंता तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख मा. राजकुमार जीमेकर यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रशासकीय सेवेचे महत्त्व, सेवेतील उपलब्ध संधी, त्यासंबंधात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी विषयांवर मान्यवरांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय राजकुमार जीमेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे संचालक डॉ. कार्तिक शिंदे यांच्या प्रेरणेने घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गुरुदेव जुमळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती वाढई यांनी केले तर आभार प्रदर्शन साक्षी काळे यांनी केले .कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .