माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या कार्यक्रमाचे आयोजन ..!

वडेगाव येथे राष्ट्रसेवा ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा, माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या कार्यक्रमाचे आयोजन..!

भद्रावती (ता.प्र.) - दिनांक २२ सप्टेंबर ला गुळगाव- वडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत मौजा वडेगाव तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे राष्ट्रसेवा ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा, माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास सौ. वंदनाताई देवेंद्र दातारकर सरपंच गुळगाव - वडेगाव अध्यक्ष, चंद्रकांत ठाकरे उपविभागीय कृषी अधिकारी, वरोरा, अनिकेत सोनवाने तहसीलदार भद्रावती, मंगेश आरेवार संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती, कु.मोहिनी जाधव तालुका कृषी अधिकारी भद्रावती, नन्नावरे ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कपिल शंकपाळे कृषी सहायक यांनी केले. ठाकरे साहेब यांनी कृषी विभागाच्या योजना याची माहिती सांगितली. सोनावणे साहेब महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सांगितली. आरेवार साहेब यांनी पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सांगितली तसेच कु.मोहिनी जाधव तालुका कृषी अधिकारी भद्रावती यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगितली . त्यानंतर कृषी विभागामार्फत मनरेगा फळबाग लागवड करण्यात मंजुरी मिळालेल्या शेतकरयांना रोपे देण्यात आली. तसेच शिधापत्रिका दुरूस्ती करून तेथेच लाभार्थी यांना देण्यात आल्या. त्यानंतर तलाठी अनिल श्रृंगारे व ज्योती शिंदे यांनी e-pik पाहणी संदर्भात माहिती सांगितली व प्रत्यक्ष शेतावर जाऊन e-pik पाहणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ गायकवाड कृषी मित्र यांनी केले. कार्यक्रम संपल्यावर सर्व विभागामार्फत लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी चर्चा करून अडचणी सोडवल्या. चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला व यांचा फायदा सर्वांना होईल अशी प्रतिक्रिया मिळाली. सदर कार्यक्रमास कृषी सहायक नन्नावरे व प्रदिप काळे यांचे सहकार्य मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.