भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे योग नृत्य प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले . यात आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.भद्रावती येथील पतंजली योग समिती यांच्या वतीने यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात योग न्यृत्य ,सकस आहार यावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले .यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी 'शरीर माध्यम खलु साधनम् 'आपले शरीर व मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पतंजली योग समितीचे भद्रावती चे अनंता मते यांनी योग न्यृत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचबरोबर यावेळी दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्व, नियमित संतुलित आहार , आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यरक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सतिश नंदनवार यांनी केले. योग प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी क्रिडा शिक्षक रमेश चव्हाण, पर्यवेक्षक ताजने सर यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण शिबिरात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी योग प्रशिक्षणाचा आनंद घेतला. यावेळी पतंजली योग समितीचे सभासद, सर्व विद्यार्थी , विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.