"एक दिवस शिष्यवृत्तीसाठी"..!

विवेकानंद महाविद्यालयात "एक दिवस शिष्यवृत्तीसाठी" अभियानाचे आयोजन..!

भद्रावती (ता.प्र.) - विविध प्रवर्गातील मुला मुलींनी उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्च विद्याविभूषित होणे यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना सुरू केलेल्या आहेत. त्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी "एक दिवस शिष्यवृत्तीसाठी" या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या अभियानाचा फायदा घेऊन आपल्या पालकांवरील आर्थिक उदंड कमी करावा असे विचार महाविद्यालयातील लिपिक दिलीप भोयर आणि गणेश गौरकर यांनी मांडले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागाद्वारे आयोजित एक दिवस शिष्यवृत्तीसाठी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर माहिती देत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. यावेळी मंचावर डॉ. प्रकाश तितरे, डॉ. बंडू जांभुळकर, लिपिक दिलीप भोयर, गणेश गौरकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. युवा दुत या संकल्पनेप्रमाणे सदरहू शिष्यवृत्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सेवा दूत म्हणून बीए अंतीम वर्षाचा महाविद्यालयातील विद्यार्थी सौरभ विठ्ठल चामाटे याची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल ठाकरे, प्रास्ताविक डॉ.बंडू जांभुळकर, आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश तितरे यांनी केले. यावेळी डॉ.विजय टोंगे, डॉ रमेश पारेलवार, डॉ. यशवंत घुमे यांच्यासह महाविद्यालयातील वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.