मातोश्री शारदा उत्सव समितीचा उपक्रम..!
भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती तालुक्यातील पानवडाळा येथे मातोश्री शारदा उत्सव मंडळ व ग्राम पंचायत पानवडाळाच्या वतीने शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाडा निमित्त गावामध्ये स्वच्छता राखण्यासाठी महिलांनी खराटे हाती घेऊन गावांमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबविले. वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन ग्राम सफाई केली.याप्रसंगी साफसफाई व कचरा गोळा करून घरोघरी महिलांना कचरा रस्त्यावर टाकू नये किंवा घरासमोरील नालीमध्ये किंवा इतरत्र कुठेही न टाकता उकिरड्यावर टाकण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये मातोश्री शारदा उत्सव मंडळ पानवडाळाच्या अध्यक्षा सविता प्रदीप महाकुलकर, उपाध्यक्षा सिमाताई घोसरे, सचिव स्वाती विधाते, छाया पिंपळकर, ग्रामपंचायत सदस्य सुषमा उताने, दिपाली काळे, कल्पना घोसरे, रजनी आस्वले पोलिस पाटील वर्षा आसेकर सि.आर.पी.बचत गटाच्या सुनिता विधाते, मनिषा विधाते , मंदाबाई विधाते, पार्वती महाकुलकर, सुवर्णा महाकुलकर व गावातील असंख्य महिलांनी भाग घेऊन गावांमध्ये साफसफाई केली.