निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात "शासन आपल्या दारी" कार्यक्रमाचे आयोजन..!
भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके प्रमुख अतिथी श्री अनिकेत सोनवणे , तहसीलदार भद्रावती , नायब तहसीलदार श्री मानकर , मंडळ अधिकारी श्री समीर वाटेकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व पाहुण्याच्या स्वागताने झाली व याप्रसंगी प्राध्यापक डॉ गजेंद्र बेदरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून कार्यक्रम घेण्याचा हेतू स्पष्ट केला.याप्रसंगी उपस्थित श्री अनिकेत सोनवणे , तहसीलदार भद्रावती यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा शासनाचा हेतू स्पष्ट केला. त्यात त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यात ऑनलाईन सातबारा , उत्पन्नाचे दाखले , मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करणे , ऑपद्वारे पिक पाहणी करणे ,जात प्रमाण प्रमाणपत्राचे पुरावे या सर्व बाबींविषयी सखोल मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी शासन आपल्या दारी या योजनेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.या कार्यक्रमाकरिता भद्रावती तहसील कार्यालयाचे कुंदा ढोक , शितल लिहितकर , डी के पारसे , योगेश गोहकर , दिलीप नागपुरे , ज्योती शिंदे हे सर्व तलाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री डॉ गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कुलदीप भोंगळे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता साक्षी स्वान , गुडिया पठाण , सानिया शेख , ऋतुजा हनवते यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.