भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चीचोर्डी भद्रावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधीर मोते,अनिल मंदाडे व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी आजच्या सामाजिक विद्वेशाच्या विचित्र परिस्थितीत महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून त्यांचे विचार आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले . मार्गदर्शन करताना सुधीर मोते यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. 'मूर्ती लहान कीर्ती महान ' असे व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण मते यांनी केले . कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या जयंतीचे औचित्य साधून शालेय परिसर स्वच्छता करून अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली.
शिंदे विद्यालयात गांधीजी व शास्त्रीजी यांची जयंती संपन्न..!
byChandikaexpress
-
0