भद्रावती (ता.प्र.) -भद्रावती तालूक्यातील गावातून भद्रावती येथे विद्यार्थीनी शाळेत येत असताना युवकाने विनयभंग केल्याची घटना घडली.या प्रकरनी भद्रावती पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.अतुल रमेश लांबट वय 29 वर्ष राहणार पिरली असे आरोपीचे नाव असून फिर्यादी विद्यार्थीनी ही रोज भद्रावती येथे शाळेत ये जा करत असून,आरोपी हा रोज तिला त्रास देत होता. परंतु आज सकाळी भद्रावती येते शाळेत येत असताना दहा वाजता मानोरा फाट्या जवळ त्याने तिला अश्लील शब्दात बोलून, हातवारे करून, तिला मारण्याची धमकी दिली. यावरून फिर्यादी विद्यार्थीने भद्रावती पोलीस स्टेशन येथे येऊन आरोपीविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध धारा 354 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली असून पुढील तपास पीएसआय अशोक बोढे करीत आहेत.