वनविभाग व सार्ड संस्था द्वारा संयुक्त कार्यक्रम..!
भद्रावती (ता.प्र.) - 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जात असतो, त्यानिमित्ताने भद्रावती तालुक्यातील कचराला वन परिक्षेत्रात आयोजित कार्यक्रमाने शालेय विद्यार्थीना निसर्ग अनुभव अनुभवता आला.वनविभाग भद्रावती व सार्ड संस्था चंद्रपूर भद्रावती टीम च्या वतीने निसर्गअनुभव ,पक्षी निरीक्षण तसेच वन आदी ची माहिती व्हावी या उद्देशाने शालेय विद्यार्थी व कर्मचारी यांना सहभागी करण्यात आले, यात मुलांनी वन भ्रमंती करून पर्यावरण विषयावर सुंदर गाणी,कविता सादर केल्या,या वेळी विद्यार्थ्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री शिंदे साहेब ,वन रक्षक दिलीप शेडमाके आणि सार्ड संस्था चे श्रीपाद बाकरे ,शुभम मुरकुटे,अमोल कुचेकर ,प्रणय पतरगे यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचा शेवट वन सहभोजनाने आनंदात करण्यात आले, कार्यक्रम यशस्वी त्तेकरीता वनविभाग टीम सार्ड संस्था टीम व शिक्षक वृन्दाचे सहकार्य लाभले.