निळकंठराव शिंदे महाविद्यालयाला विद्यापीठाचे तीन पुरस्कार..!

भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाला सत्र 2021- 2022 करिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालय एकक पुरस्कार , उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार व उत्कृष्ट शिक्षिका पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली परिक्षेत्रातील वर्ष 2021 - 2022 करिता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य , शिक्षक व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यकरिता विद्यापीठा मार्फत पुरस्कार प्रदान केल्या जातात व त्यांच्या गौरव सन्मान केला जातो करिता दरवर्षी विद्यापीठ स्थापना दिन दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी विद्यापीठात कार्यक्रम घेतल्या जातो.सदर कार्यक्रम विद्यापीठाचा ११ वर्धापन दिन घेण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रशांत बोकारे, कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ,श्री अशोक नेते, खासदार - चिमूर लोकसभा क्षेत्र, डॉ शरद निंबाळकर , माजी कुलगुरू पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला, डॉ श्रीराम गावडे, प्र कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, डॉ देवराव होळी, आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र व डॉ अनिल हिरेखन, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली परिक्षेत्रातील वर्ष 2019 - 2022 करिता महाविद्यालयाला उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालय एकक पुरस्कार प्राप्त झाला असून सदर पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व सन्मानचित्र घेऊन सत्कार करण्यात आला.

तसेच महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ गजेंद्र बेदरे , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांना सत्र 2021 - 22 चा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्र कुलगुरू डॉ श्रीराम कावळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ अपर्णा धोटे यांना सत्र 2021 - 2022 चा गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार डॉ शरद निंबाळकर , माजी कुलगुरू पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या हस्ते सन्मानपत्र विद्यापीठ स्मृती चिन्ह व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. सत्र 2021 - 2022 मध्ये महाविद्यालयाला विद्यापीठ स्तरीय तीन पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, डॉ कार्तिक शिंदे, सचिव , भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, डॉ विशाल शिंदे,सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती प्राचार्य डॉ एल एस लडके तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व समाजाच्या विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.