भद्रावती (ता.प्र.) - विना परवाना शहराच्या मुख्य रस्त्यावरून वेगाने धावतात ट्रिपल सीटर? धूम ठोकणाऱ्यांच्या दुचाकींचा वेग नियंत्रीत करणार तरी कोण? — वेग नियंत्रित करणारे पोलीस प्रशासन का ? — पायदळ चालणाऱ्या नागरिकांना पडला प्रश्न ? — वेगाला आवरा,जीवाला सावरा,वाहतूक नियमाची होते पायमल्ली..भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची सतत वर्दळ सुरु असते, त्यात प्रवाशांसाठी सततचे चालणारे ऑटो, शालेय विध्यार्थीची बस, मालवाहू, ट्रान्सपोर्ट चे हायवा , ट्रैक्टर आणि इतर चालणारी चारचाकी वाहने, आणि त्यातच अल्पवयिन धूम चालक विना परवाना धारक, दूचाकी नंबर नसलेले आपली महागडी दुचाकी याच मुख्य रस्त्यावरून सुसाट्याने चालवून कर्कश ध्वनी करून वेगवान पळवितात. अपघातास निमंत्रण देणारे यांचा वेग नियंत्रित करणार तरी कोण ? महागडी दुचाकी घेऊन देणारे पालक कि वेग नियंत्रित करणारे पोलीस प्रशासन ? असा प्रश्न रस्त्याच्या कडेला पायदळी चालणाऱ्या नागरिकांना पडला आहे.
सध्या तालुक्यात आणि शहरात सणा सुदीचे दिवस असुन विजयादशमी, शारदास्तोव, नवरात्र उत्सव सुरु असल्याने देवी विसर्जन असो कि एखादी सामाजिक रॅली असो तालुक्यातील व शहरातील बाजारपेठ करीता पायदळी येणाऱ्याना याच मुख्य रस्त्यावरून ये जा करावी लागते. पानटपरी वर उभ्या असणाऱ्यां उलट- सुलट दूचाक्या, संताजी नगर चौक, जूना मच्छी मार्केट चौक, जूना बस स्थानक परिसरात, मस्जिद चौक , गांधी चौक व नाग मंदिर परिसरात अशा वर्दळीच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था नसल्याने आपली दुचाकी नेमकी कुठे लावावी असा प्रश्न नेहमी उद्भवतो. मुख्य रस्त्याच्या कडेला उभी असलेले दूचाकी व चारचाकी वाहणे आणि अतिक्रमणमुळे रस्त्यावरच दुचाकी उभी ठेवून खरेदी करावी लागते, आणि यातच अल्पावयिन, सुसाट दुचाकी चालविणारे, विना परवाना धारक अपघातास निमंत्रण देऊन यांचा दुचाकी वेग वर अंकुश लावेल तरी कोण? असा प्रश्न उदभवून पोलिस प्रशासन यांचेवर् नेहमीसाठी तंगीत १३ वा महिना या उक्ति प्रमाने कारवाई चा बड़गा उभारेल का? यावर पायदळी चालणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले.
भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची सतत वर्दळ सुरु असते, त्यात प्रवाशांसाठी सततचे चालणारे ऑटो, शालेय विध्यार्थीची बस, मालवाहू, ट्रान्सपोर्ट चे हायवा , ट्रैक्टर आणि इतर चालणारी चारचाकी वाहने, आणि त्यातच अल्पवयिन धूम चालक विना परवाना धारक, दूचाकी नंबर नसलेले आपली महागडी दुचाकी याच मुख्य रस्त्यावरून सुसाट्याने चालवून कर्कश ध्वनी करून वेगवान पळवितात. अपघातास निमंत्रण देणारे यांचा वेग नियंत्रित करणार तरी कोण ? महागडी दुचाकी घेऊन देणारे पालक कि वेग नियंत्रित करणारे पोलीस प्रशासन ? असा प्रश्न रस्त्याच्या कडेला पायदळी चालणाऱ्या नागरिकांना पडला आहे.
सध्या तालुक्यात आणि शहरात सणा सुदीचे दिवस असुन विजयादशमी, शारदास्तोव, नवरात्र उत्सव सुरु असल्याने देवी विसर्जन असो कि एखादी सामाजिक रॅली असो तालुक्यातील व शहरातील बाजारपेठ करीता पायदळी येणाऱ्याना याच मुख्य रस्त्यावरून ये जा करावी लागते. पानटपरी वर उभ्या असणाऱ्यां उलट- सुलट दूचाक्या, संताजी नगर चौक, जूना मच्छी मार्केट चौक, जूना बस स्थानक परिसरात, मस्जिद चौक , गांधी चौक व नाग मंदिर परिसरात अशा वर्दळीच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था नसल्याने आपली दुचाकी नेमकी कुठे लावावी असा प्रश्न नेहमी उद्भवतो. मुख्य रस्त्याच्या कडेला उभी असलेले दूचाकी व चारचाकी वाहणे आणि अतिक्रमणमुळे रस्त्यावरच दुचाकी उभी ठेवून खरेदी करावी लागते, आणि यातच अल्पावयिन, सुसाट दुचाकी चालविणारे, विना परवाना धारक अपघातास निमंत्रण देऊन यांचा दुचाकी वेग वर अंकुश लावेल तरी कोण? असा प्रश्न उदभवून पोलिस प्रशासन यांचेवर् नेहमीसाठी तंगीत १३ वा महिना या उक्ति प्रमाने कारवाई चा बड़गा उभारेल का? यावर पायदळी चालणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले आहे.