पोलिसांचा ताफा अचानक थांबला ..!


पोलिसांचा ताफा अचानक थांबला अन ते म्हणाले, ते बारामतीहून आलेत त्यांना बोलवा .! मी अनुभवलेला अफाट माणूस - देवेंद्र फडणवीस .! पत्रकार मच्छिंद्र टींगरे यांचे भावना स्पर्शी मनोगत .!
मुबई (जगदीश काशिकर) - अचानक एक महत्वाचं कामं निघालं आणि ते कामं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणार होतं. एका गरीब व्यक्तीचं पण तितकंच महत्वाचं असल्यामुळे मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दौरा माहिती करून घेतला. साहेब सकाळी सागर निवासस्थानी आहेत अशी माहिती मिळाली, आम्ही लगेच मुंबईला निघण्याची तयारी केली. मुंबईत पोहचताच प्रचंड ट्राफिक चा सामना करावा लागला, दुर्दैवाने आम्हाला सागर निवसस्थानी पोहचायला उशीर झाला. बंगल्याच्या बाहेरचं ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं, आम्ही गाडीतून उतरून रस्त्यावर थांबलो.
पोलिसांचा कॅनवाय बाहेर पडला..माझ्यासॊबत असलेले बारामतीकर नाराज झाले...तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आमच्याकडे गेले...त्यांनी ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितली..अचानक ताफा थांबला पोलीस गडबडले.
साहेबांनी गाडीची काच खाली घेऊन ते बारामतीवरून आलेले त्यांना पाठवा....मी सोबत असलेल्या माणसाबरोबर साहेबांजवळ गेलो...साहेब म्हटले काय पत्रकार काय चालले...मी म्हटलं साहेब ठीक आहे....हे या व्यक्तीचे कामं आहे.
बारामतीचा माणूस माझ्याबरोबर असल्याने त्यांना वाटलं या कामाकडे राजकीय दृष्ट्या पाहतील काय?निवेदन वाचले..लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून कामं मार्गी लावले...जाताना थांबणार असाल तर संध्यकाळी भेटा असं ही सांगितले.
माझ्याबरोबर सोबत असलेले बारामतीतकर भावुक झाले...जे कामं होणारच नाही असं वाटतं होतं ते झालं पण....एवढा मोठा माणूस जो इतक्या मोठ्या पदावर असून बोलण्यातील नम्रपणा सोबत असलेल्या खूप बारामतीकरांना भावला..कामं समजून घेऊन ते किती महत्वाचं आहे..जनतेचं त्यात हीत आहे तर तो कोणताही प्रांत असू दया....चार लोकं नाराज झाली तर चालतील पण चार हजार लोकांचं हीत जपणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अफाट माणूस आहे....राजकारणाराच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर "लोकनेता" हा एकच शब्द त्यांच्यासाठी लागू होतो.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.