पुण्यातील सेक्स स्कॅण्डलमध्ये बिशपचा रोल उघडकीस ..!


स्प्राऊट्स Exclusive 
मुंबई (जगदीश काशिकर) - वादग्रस्त व लिंगपिसाट फादर विन्सेंट परेरा हा होमोसेक्सयुअल आहे, सध्या तो जामिनावर सुटला आहे. त्याचे कोणाशी, कोणत्या पद्धतीचे संबंध होते, हे उघडकीस यायला हवे. यातूनच त्याला वेळोवेळी पाठीशी घालणाऱ्या बड्या धेंडांची नावेही जगासमोर येतील व धर्माच्या बुरख्याआड 'धंदा' मांडणाऱ्यांचा पर्दाफाश होईल.  
विन्सेंट परेरा या फादरने आतापर्यंत अनेक लहान मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. यापैकी दोन प्रकरणात त्याच्यावर एफआयआरही झाले. ( इतर असंख्य प्रकरणे वेळोवेळी बिशप थॉमस डाबरे व परेरा यांनी 'मॅनेज' केली ). तरीही हा लिंगपिसाट मोकाट फिरत आहे. 
विन्सेंट परेरा याच्या अत्याचारांना बळी पडलेल्या शालेय मुलांच्या पालकांनी याविरोधात बिशप थॉमस डाबरे ( Bishop Thomas Dabre ) यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळेला बिशप डाबरे हा त्या पालकांनाच धमकवायचा, अशी माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे. 
बिशप थॉमस डाबरे यांची पाठराखण परेरा हा अविवाहित असून होमोसेक्सयुअल आहे. 
आतापर्यंत त्याने असंख्य मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहेत. कितीतरी वर्षे तो अशी किळसवाणी कृत्ये करायचा. प्रत्येक वेळेला डाबरे हे त्याला संपूर्ण पाठींबा द्यायचे व संपूर्ण सहकार्यही करायचे, हे 'स्प्राऊट्स'च्या हाती लागलेल्या कागदपत्रांतून दिसून येते. 
डाबरे हे पुणे जिल्ह्याचे प्रमुख (diocese ) आहे. या जिल्ह्याच्या अंतर्गत केवळ पुणे जिल्हाच नव्हे तर सोलापूर, सांगली ही शहरेही येतात. याशिवाय या सर्व शहरांतील १७ कॉन्व्हेंट शाळांचे मुख्याध्यापक नेमायचे अधिकारही डाबरे यांच्याकडेचा आहेत. याचा डाबरे यांनी पुरेपूर फायदा उचलला. त्यामुळेच या लिंगपिसाट परेरा याने केलेले असंख्य कृत्ये माहित असूनही डाबरे हे परेरा याला थेट नव्या शाळेच्या मुख्याध्यापकपदी बसवायचे. 
२०१८ च्या प्रकरणात परेरा याने तीन कोवळ्या मुलांचे कपडे काढले. त्यांना नग्न केले. त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवले व त्यांच्यावर अत्याचार केले. त्या प्रकरणात तो दीड वर्षे पुणे येथील येरवडा तुरुंगात होता. हे ज्या शाळेत ( St Patrick's High school and Junior College ) घडले, ती शाळा तर बिशप यांच्या घराच्या आवारातच आहे. त्यामुळे डाबरे यांचा या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
हडपसर येथील प्रकरणात परेरा यांच्यावर पॉस्कोचा ( Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act.) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात थॉमस डाबरे यांचेही नाव सहआरोपी म्हणून आहे.
परेरा हा होमोसेक्शुअल आहे, त्याने असंख्य वेळेला कोवळ्या मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केलेले आहे. सोलापूर येथील St Joseph's School या शाळेत तर तो शाळेतील सुरक्षारक्षकासोबत समलैंगिक संबंध ठेवले होते. डाबरे यांच्याशी परेरा याचे संबंध कोणत्या स्वरूपाचे होते, या सर्व गोष्टींचाही तपास हडपसर येथील पोलीस करीत आहेत.  
 

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.