शेतकरी कुटुंबियांसोबत मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली.!


'वर्षा' या शासकीय निवासस्थानी राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली.!
मुंबई (जगदीश काशिकर) - दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत असताना आज 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. याप्रसंगी शेतकरी बंधू भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे औक्षण करीत त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.  
राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करीत असल्याचे यासमयी सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली.
राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरुपात शेतकरी बांधव सपत्निक या अनोख्या सोहळ्याला उपस्थित होते. पहिल्यांदाच अशा स्वरुपाची दिवाळी वर्षा येथे साजरी झाल्याचे अनेकांनी याप्रसंगी सांगितले.

याप्रसंगी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ.लता, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत, स्नुषा सौ.वृषाली यांनी प्रत्येक शेतकरी कुटुंबांचे औक्षण केले. त्यांना साडी-चोळी, धोतर आणि सदरा देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.  
याप्रसंगी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंद अडसुळ यांच्यासह सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.