S.P. यांनी कार्यभार हाती घेताच, पोलिस अधिकारी आले एक्शन मोड़ मध्ये..!


पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेसी यांनी कार्यभार हाती घेताच पोलिस अधिकारी आले एक्शन मोड़ मध्ये..!
साप्ताहिक कलम मांगे इन्साफ मध्ये बातमी प्रकाशित होताच राजुरा पोलिसानी केले अवैध तंबाकू तस्कर कडून 10 लाखाचे तंबाखू सह मुद्देमाल जप्त व आरोपी अटक.
चंद्रपुर (वि.प्र.) - चंद्रपुर पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेसी यानी नुक्तेच कार्यभार हाती घेतले असुन पोलिस अधिकारी सक्रिय झाल्याचे चित्र दिसू लागले असे महटल्यास अतिशयोक्ति होणार नही तसेच साप्ताहिक कलम मांगे इन्साफ च्या दिनांक 22अक्टूबर रोजी च्या अंकात चंद्रपुर जिले में सुगंधित तंबाकू तस्करों का बढ़ रहा है प्रमाण,इस ओर संबंधित विभाग क्यों नही दे रहा है ध्यान.
या टाइटल लाइन ने बातमी प्रकाशित केली होती या बातमी ची दखल राजुरा पोलिसानी घेउन दि. 25/10/22 रोजी पोलिस स्टॉप सह पेट्रोलिंग  करीत असतांना मौजा वाकडी वरून राजुरा कडे एक पांढऱ्या रंगाचे सुमो गोल्ड गाडी क्र. एम. एच 34 ए.एम 3024 या वाहनामध्ये शासनाने बंदी घातलेले सुंगधीत तंबाखु विक्री करीता घेवून येत आहे असे मुखबिर द्वारे मिळालेल्या माहितीवरून पंच व पोस्टॉफ सह राजुरा ते आसिफाबाद रोडवरील सोंडो ते वरूर रोडवर सापळा रचुन नाकेबंदी करीत असतांना मुखबीरने सांगितलेली वाहन येताना दिसल्याने सदर वाहन पोलिस स्टॉफ चे मदतीने थांबवून पंचासमक्ष वाहन चालकास त्यांचे नाव पत्ता विचारलं असता  त्त्याने आपले नाव युवराज उर्फ आकाश चंद्रभान तिवारी वय २५ वर्ष.रा. कोठारी, असे सांगितलेवरून त्याचे ताब्यातील वाहनामध्ये शासनाने बंदी घातलेल्या सुगंधीत तंबाखु संबधाने कायदेशिर रित्या झडती घेतली असता वाहनामध्ये पुढीलप्रमाणे शासनाने बंदी घातलेल्या व लोकांच्या आरोग्यास धोका असलेले सुगंधीत तंबाखु - पान मसाला खालील वर्णनाचा माल मिळून आला.
1) ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहलेले 200 ग्रॅमचे सिलबंद 92 नग पाउच प्रत्येकी 340 रू प्रमाणे एकुन किंमत 31280 /- रूपये
2) मजा 108 हुक्का – शिशा तंबाखूअसे लिहुन असलेले प्रत्येकी 50 ग्रॅमचे सिलबंद 398 नग डब्बे, प्रत्येकी 235 रू. प्रमाणे एकून कीमत 93,530/- रु
3) मजा 108 हुक्का – शिशा तंबाखु असे लिहीलेले प्रत्येकी 200 ग्रॅमचे सिलबद 476 नग डब्बे प्रत्येकी 235 /- रू प्रमाणे एकूण कि 4,45,060 /- रु.
4) विमल पान मसाला असे नाव असलेले 104 सिलबंद पाउच प्रत्येकी 120 रू प्रमाणे एकूण कि. 12480/- रु.
5) सिगनेचर फिटनेस पान मसाला असे नाव असलेले 75 सिलबंद पुडी प्रत्येकी 320 रू नग प्रमाणे कि. 24000/- रु
6) प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू वाहतुकी करीता वापरलेले एक पांढऱ्या रंगाची सुमो गोल्ड क्र एम एच 34 ए एम 3024 कि अंदाजे 4,00000/- रु.
7) इसम नामे युवराज उर्फ आकाष चंद्रभान तिवारी यांचे ताब्यातील एक विवो 21 प्रो कपनीचा मोबाईल कि -10,000/- रु असा एकूण कि.10,16350/- रू चा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेण्यात आला व पोस्टेचे मालखान्यात जमा करण्यात आले तसेच मा. अन्न सुरक्षा अधीकारी साहेब  व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन चंद्रपुर याना पुढील कार्यवाही होणेबाबत पत्रव्यवहार तसेच माहिती देण्यात आली त्यांचेकडून कार्यवाही होताच पुढील कार्यवाही करण्यात येते.
सदरची कार्यवाही मा.उपविभागीय पोलिस अधिकारी पवार सा यांचे नेतृत्वाखाली मा.ठाणेदार  सपोनी दरेकर सां यांचे मार्गदर्शनाखाली परी.पो उपनि राठोड सा. Asi टेकाम/1753,HC रवींद्र नक्कनवार/715,Hc किशोर तुमराम/419 ,पो.शी महेश/2802  यांनी केली असुन पुढील तपास गंभीर्याने केल्यास अनेकांची नावे समोर येणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे राजूरा पोलीसानी तंबाकूची वाहतुक करनारे आरोपी ला अटक केले पण हा माल त्याचाच आहे की त्याचा सुद्धा कोनी बॉस आहे या बाबतीत कसुन तपास करण्याची गरज आहे कारण की चंद्रपुर जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू तस्करचे धागे दोरे एकमेकांशी जुडून असल्याची शक्यता नाकारता येनार नाहि हे मात्र तेवढेच खरे असे म्हणता येइल.तंबाखू तस्कराचे वाईट दिवस आता सुरु झाले असुन अन्न औषध प्रशासन विभागानेही आता एक्शन मोड मध्यें येण्याची तत्परता दाखवावी. पोलिस विभाग व अन्न औषध विभागाने संयुक्तरित्या प्लानिंग करून अश्या अनाधिकृत रित्या तंबाखू तस्करावर कारवाई केल्यास. त्याना हा अवैद्य धंदा बंद करावाच लागणार यात शंका नाही.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.