शिंदे विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन संपन्न..!
भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन संपन्न झाला.वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक ताजने सर हे मंचावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती पूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येते . विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण वाचन करावे .वाचनातून आपले विचार प्रगल्भ होतात ,आपले व्यक्तिमत्व विकसित होते ,असे मार्गदर्शन केले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना हात धुण्याची प्रात्यक्षिक व महत्त्व पाठवून देण्यात आले. मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने स्वच्छतेच्या व आरोग्याच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांनी लावून घेतलेल्या होत्या. आता मात्र कोरोना पूर्ण संपला असे समजून आपण सर्व चांगल्या सवयी बंद केल्या आहेत . म्हणून विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक चांगल्या सवयी लावून घ्याव्यात. नियमित हात धुतल्याने आपले आरोग्य चांगले राहते असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन श्री नंदनवार यांनी केले.आभार प्रदर्शन कोल्हे सर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत शिक्षक ,प्राध्यापक, विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
