राज्यातील तीनही शासकीय कला व आभिकल्प महाविद्यावलयातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मुद्रा चित्रण कार्यशाळेचे उदघाटन..!
भद्रावती (ता.प्र.) - राज्यातील तीनही शासकीय कला व आभिकल्प महाविद्यालयामध्ये शिकवणारे शिक्षकांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे तसेच तीनही शासकिय कला व अभिकल्प महाविद्यालयातील निवडक २० विद्यार्थी यांच्या मुद्रा चित्रण कार्यशाळेचे उदघाटन दिनांक १२/१०/२०२२ रोजी शासकीय कला व अभीकल्प महाविद्यालय, नागपूर येथे करण्यात आले.या प्रदर्शनात सर ज.जी. कला महाविद्यालय, मुंबई, कला व अभिकल्पा महाविद्यालय, नागपूर आणि शासकिय कला व अभिक्लप महाविद्यालय, औरंगाबाद येथील अध्यापक यांच्या कलाकृतींना स्थान देण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, राज्याचे कला संचालक प्रा. विश्वनाथ साबळे, अधिष्ठाता प्रा. भरत गढरी प्रामुख्याने उपस्थित होते. तीनही शासकिय कला व अभीकल्प महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्या कलाकृतीचे एकत्रित प्रदर्शन कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई तर्फे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले असून यात ७० कलाकृतींचे समावेश आहे. शिक्षक व विद्यार्थी एकत्रित येऊन कला विचारांची देवाणघेवाण व्हावी हा या आयोजन मागील उद्देश आहे असे कला संचालक म्हणाले. या प्रदर्शना चे मुख्य समन्वयक प्रा. मारोती शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे फिरते प्रदर्शन व कार्यशाळा औरंगाबाद व मुंबई येथे होईल. तसेच नागपुरात मुद्रा चित्रण कार्यशाळा घेण्यासाठी मुंबई हून डॉ. शशिकांत गोरखे व नागपूर मधून प्रा. पंकज इटकेलवार समन्वयक म्हणून काम पाहतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास जोशी यांनी केले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि कला रसिक उपस्थित होते. हे प्रदर्शन २० ऑक्टोंबर पर्यंत सर्वांसाठी १० ते ६ या वेळेत खुले राहील.
