अधिपरिचारीकांना दिवाळी भेट .!


ना. सुधीर मुनगंटीवार व सौ. सपना मुनगंटीवार यांच्‍यातर्फे अधिपरिचारीकांना दिवाळी भेट .!
बल्लारपुर (का.प्र.) - वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार व सौ. सपना मुनगंटीवार यांची नात व डॉ. सौ. शलाका व डॉ. श्री. तन्‍मय बिडवई यांची कन्‍या शुरवी हिच्‍या पहिल्‍या दीपावलीनिमीत्‍त सामान्‍य रूग्‍णालय चंद्रपूर येथील २०० अधिपरिचारीकांना हॅन्‍डबॅग व मिठाईचे वाटप करण्‍यात आले. तसेच रूग्‍णालयातील डॉक्‍टर्स, स्‍वच्‍छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मदतनिस तसेच दवाखान्‍यात असणा-या सर्व रूग्‍णांना मिठाई वाटप करण्‍यात आली. त्‍याचप्रमाणे ५ स्‍ट्रेचर्स चे वितरण रूग्‍णालयाला यावेळी करण्‍यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर महानगर जिल्‍हयाचे कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, महानगर जिल्‍हयाचे युवा आघाडी प्रमुख विशाल निंबाळकर, जिल्‍हयाचे उपाध्‍यक्ष सुरज पेदुलवार तसेच रूग्‍णालयाचे काम पाहणारे साजीद कुरैशी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.