मुंबई (जगदीश काशिकर) - गोरगरिबांच्या हाकेला धावणारा मुख्यमंत्र्यांची सावली आमचे गुरुवर्य श्री मंगेश चिवटे यांच्या तत्परतेमुळे मुख्यमंत्री सहायत्ता कक्षातून ४ लाख रुपयांची मदत झाली मंजूर.
(किडनी प्रत्यारोपण साठी चार लाख रुपयाची मदत) किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांची माहिती मिळाली. सदर माहितीवरून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांना रुग्णाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. वैद्यकीय मदत कक्षाच्या ईमेल वरुण अपलोड केल्यानंतर फक्त ३ दिवसात मुख्यमंत्री कार्यालयातून मंगेशजी चिवटे साहेबांच्या माध्यमातुन आज दोन्ही रुग्णांना यांना एकुण ४ लाख रुपये मंजुरी मिळाली, खरच मदत करण्यासाठी सुद्धा मोठे मन लागते हे आज कक्ष प्रमुख मंगेश चिवटे सरांनी दाखवून दिले.
यावेळी मुंबई मंत्रालयामध्ये दिवस रात्र नागरिकांच्या सेवेसाठी काम करणारे आमचे सहकारी मार्गदर्शक दादासाहेब थेटेजी, रवींद्रजी नानवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या केलेल्या मदतीबद्दल त्यांच्या नातेवाईकाकडून आभार मानले गेले.
पक्षविरहित समाजकार्य हीच आमुची ओळख..मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे.