वरोरा येथे सूरू असलेल्या आंतरविभागीय व्हाॅलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थिती..!
वरोरा (वि. प्र.) - वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन व लोकशिक्षण संस्था वरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथील स्व. मनोहरभाऊ पाटील क्रिडा परिसरात आयोजित (WSF चषक) महाराष्ट्र राज्य ज्युनियर गट आंतरविभागीय व्हाॅलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी नागपूर विभाग विरुद्ध मुंबई विभाग असा मुलींचा उद्घाटनीय सामना पार पडला. या सामन्याचा त्यांनी प्रमुख पाहुण्यांसह आनंद घेतला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने उत्साही स्पर्धक येथे आले आहेत. सर्वांनी सांघिक वृत्ती जोपासत खेळ खेळावा. याठिकाणी विजयी होणार्या संघांना येथील विजयासह यापुढे राष्ट्रीय पातळीवर होणार्या स्पर्धेसाठी माझ्या अनेक शुभेच्छा असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी याप्रसंगी बोलताना केले.यावेळी माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, माजी नगरसेविका सौ. सुनिताताई काकडे, श्रीकांत पाटिल, गजाजन जिवतोडे, माजी नगरसेवक अनिल साखरीया, दिलीप घोरपडे, विनोद चौधरी, प्रविण सोदारी, बबलू सातपुते, भाजयुमोचे अमित चवले संदिप ऊईके यांचेसह मोठ्या संख्येने खेळाडू मित्रमैत्रिणी उपस्थित होते.