मजरा (रै) येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिर सपन्न..!

भद्रावती (ता.प्र.) - जागतिक स्तन कर्करोग जनजागृती दिना निमित्त दि. १४ ऑक्टोबर जी.एम.आर. फाउंडेशन आणि टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम, चंद्रपूर यांच्या वतीने मजरा रै, वरोरा येथे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात परिसरातील १०० स्त्री व पुरुषांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी जी.एम.आर. चे युनिट हेड देशपांडे, विश्वकर्मा टाटा ट्रस्ट चे डॉक्टर आशिष बारब्दउपास्थित होते. यावेळी कॅन्सर बद्दल जागृती करण्यात आली तसेच मुख, स्तन, गर्भाशय या अवयवांची कर्करोगसाठी तपासणी करण्यात आली.

यावेळी डॉ. बारब्दे यांनी कॅन्सर ची तपासणी लवकरात लवकर झाली तर कॅन्सर बरा होऊ शकतो असे सांगितले.आरोग्य शिबिरात टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम आणि आरोग्य केंद्राचे डॉक्टर, परिचारिका यांच्या मार्फत तपासणी करण्यात आली. याप्रसंगी रक्तदाब, मधुमेह, मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोग आणि कावीळ ची तपासणी करण्यात आली. सदर शिबिरात उपस्थितांना मुख, स्तन आणि गर्भाशय कर्कराेगाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले तसेच कर्करोगाच्या लक्षणा विषयी, हा आजार हाेऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, या महत्त्वाच्या बाबींवर डॉक्टर वैदेही यांनी मार्गदर्शन केले व उपचारा विषयी माहिती देण्यात आली. सूरज साळुंके यांनी प्रास्ताविकातून या शिबिराच्या आयोजनाचा हेतू विशद केला. यावेळी सर्वांनी तपासणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".