नागपुर (वि.प्र.) - समाज सेवक व सचिव भोई समाज पंच कमेटी व विदर्भ अध्यक्ष भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेश प्रा.राहुल गौर यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणजे काय? व ते भारतात केव्हा पासून केले जाते साजरे, यावर संबोधन केले. आपल्या संबोधनात त्यांनी म्हटले बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी सारनाथ मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हटले जाते.महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे.
वाठोडा येथे युवां द्वारा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा ..!
byChandikaexpress
-
0

