सिलंबम खेळात प्राविण्य .!
भद्रावती (ता.प्र.) - यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील 19 वर्षे वयोगटा खालील मुली सिलंबम या खेळ प्रकारात 3 खेळाडूंनी प्राविण्य प्राप्त करत जिल्ह्यात वर्चश्व संपादन केले. त्यांची निवड विभाग स्तरावर झाली.
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे दि.25-11-2022 ला संपन्न झालेल्या सीलंबम या क्रीडा प्रकारात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती च्या तीन विद्यार्थिनी विभागीय स्तरावर निवडल्या गेल्या. आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत जिल्हास्तरावर सिलंबम खेळातील विविध प्रकारात त्या प्रथम आलेल्या आहेत. त्या विभागीय स्तरावर सीलंबम या क्रीडा प्रकारात चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यात कु .नैना राऊत, देवयानी चव्हाण, कोमल बोधाने यांनी या खेळात जिल्हा स्तरावर नैपुण्य प्राप्त केले आहे.
विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे , सचिव डॉ. कार्तिक शिंदे,सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश हटवार , अतुल गुंडावार , चंद्रशेखर जुमडे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. विभागीय स्तरावर होणाऱ्या क्रीडास्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.