"खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांची वनाधिकाऱ्यासोबत आढावा बैठक ..!

बैठकीत दिल्या महत्वपूर्ण सूचना : गेल्या 10 -11 महीन्यात सुमारे 39 व्यक्तींचा बळी..!
चंद्रपूर (वि.प्र.) - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मानव वन्यजीव संघर्ष सुरु असतो. यामध्ये गेल्या 10-11 महीन्यात सुमारे 39 व्यक्तींचा बळी वाघ व बिबट या जंगली श्वापदांनी घेतला आहे. हि बाब गंभीर आहे. आजवर बळी गेल्यानंतर त्या हिंसक प्राण्याला पकडण्यात येते. यापुढे व्यक्तींच्या बळी होण्यापूर्वी वाघ किंवा बिबट्याचा पकडण्याची उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केल्या आहे.
     याबैठकीला खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, भद्रावती नगर परिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प उपसंचालक पाठक, विभागीय वन अधिकारी चंद्रपूर श्री खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, माधव जीवतोडे, शंकर भरडे, धनंजय गुंडावार, बापू वाढाळे, ओम वैद्य, महेश मोरे, रवी देठे, अमोर पोटे, रुपेश वाघाडे, प्रवीण बोबडे यांची उपस्थिती होती.  
      ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढलेली आहे, यासोबतच मानव व पाळीव जनावरांवर हल्ले देखील मोठया प्रमाणात सुरु आहे. हे हल्ले थांबविण्यात वनविभागाला अपयश येत आहे. जंगलात हल्ले झाले तर वनविभाग दोषी नाही मात्र गावांमध्ये , मानवी वसाहतींमध्ये येऊन दहशत सुरु असल्याने कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.
      वेकोली चंद्रपूर क्षेत्रात पद्मापूर, दुर्गापूर, भटाळी या ठिकाणी तसेच वेकोलीच्या माजरी क्षेत्रात ढोरवासा, तेलवासा, नविन कुनाडा, जुना कुनाडा व माजरी या बंद खाणीच्या तसेच नागलोन, एकोणा या खाण परीसरात वाघाचा मुक्त वावर आहे. यामुळे हजारो वेकोली कामगारांचा जीव धोक्यात आहे, पाळीव जनावरे मोठया प्रमाणात शिकार होत असून गेल्या 10-11 महीन्यात सुमारे 39 व्यक्तींचा बळी वाघ व बिबट या जंगली श्वापदांनी घेतला आहे, वाघांचे अस्तीत्व टिकविण्यासाठी शासनाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. मात्र, वाघ व बिबट या जनावरांचा बंदोबस्त करुन मानव व वन्यजीव संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी शासन कोणतेही प्रयत्न करीत नाही ही अतिशय खेदाची बाब असल्याची नाराजी यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी बोलून दाखवली.
     त्यासोबतच वाघांचा बंदोबस्त करण्याचे अधिकार वरिष्ठ पातळी वरील अधिका-यांकडून काढून त्वरीत जिल्हा प्रशासन व जिल्हा स्तरीय वनविभागाला द्यावेत, जैवविविधतेतला मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विकसनशील देशांसारखी जैवविविधता समृध्द करण्यासाठी ग्रामसभांचे माध्यमातून विकास आराखडा तयार करणे, ग्रामसभेच्या माध्यमांतून पांरपारिक पध्दतीने लोकसमुदायाकडून वन्यजीवांचे संरक्षण करणे, वनहक्क कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे (कलम 5 नुसार) अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी अधिनियम 2006 व 2008.
    8. वनहक्क कायद्यानुसार लोकसमुदायाचे वनावरील अधिकार कायम करणे, वाघांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणा-या वन्यजीव प्रजातीचे संवर्धन करणे. (कोल्हे, लांडगे, रानकुत्रे), वाघांवर नियंत्रण ठेवणे (संख्येवर) साठी अभ्यास प्रशिक्षण व कृती आराखडा, वन्यजीवांचे नैसर्गिक भ्रमण मार्ग ठेवणे. (कृत्रीम तलाव, रिसॉर्ट), नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे या उपाययोजना करण्याच्या सूचना या बैठकीत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वनाधिकाऱ्यांनी दिल्या. यापैकी बहुतांश समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी वनाधिकाऱ्यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.