हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवा - मा.एकनाथ शिंदे

कराड येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जाहीर मेळाव्यात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विराट जनसमुदायाला संबोधित केले ..!
कराड (जगदीश काशिकर) - राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. सगळे निकष बाजूला सारून बळीराजाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. अजूनही शासनाकडे पंचनामे येत असून त्यांनाही मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
कराड शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तात्काळ निधी मंजूर केला, कराड शहरातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विकासासाठी शिंदे सरकार ५० नव्हे तर १०० खोके द्यायलाही तयार आहे असे निक्षून सांगितले. 
हे सरकार पडेल असे वारंवार सांगितले जाते, हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असे जाहीर आव्हान यासमयी बोलताना दिले. हिंदुत्वाच्या विचारांशी सत्तेसाठी गद्दारी करणार नाही असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
आजच्या या सभेत दलित पँथरचे अध्यक्ष सुखदेव सोनावणे यांनी आपल्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष आणि कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनीही आपल्या बारा नगरसेवकांच्या साथीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. 
याप्रसंगी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार महेश शिंदे, खंडाळ्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, साताऱ्याचे युवासेना जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, सातारा शहराचे शहरप्रमुख निलेश मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच कराडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.