सायबर सुरक्षा आणि लैगिंक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण - जीबी पोक्सो कायद्या बाबत राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी चंद्रपूर येथे जागरुकता कार्यक्रम.!
चंद्रपूर (वि.प्र.) - दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, रिसर्च अँड टेक्नॉलाजी, चंद्रपूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर आणि पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष बी-टेक २०२२-२३ या सत्राच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला.
बालक देशाची संपत्ती, उद्याची पिढी, भविष्य मानली जाते, तिचे योग्य प्रकारे पालन-पोषण, संवर्धन व्हावे, निकोप, शारीरिक, मानसिक, बौध्दिक आणि सामाजिक विकास व्हावा, बालकास अत्याचारांपासुन संरक्षण मिळावे, बालपण सुदृढ रहावे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, बालकांचे कोणत्याही प्रकारच्या शोषणापासुन संरक्षण व्हावे या मुख्य हेतुने “The Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act 2012" या नावाने केंद्र सरकारने बालकांच्या संरक्षणार्थ सन २०१२ मध्ये विशेष कायदा पारित केला. स्त्रिया, मुले, मुलीवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. परंतू त्याचबरोबरच जनजागृती ही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे वाढते सायबर अपराधांची घटना पाहता सायबर सुरक्षा व उपाय योजना या विषयावर सुध्दा शाळा - महाविद्यालयात सदर जागरुकता उपक्रम राबविले तर विद्यार्थी-विद्यार्थीनीमध्ये स्व-संरक्षणबाबत आणि सायबर सुरक्षा बाबत जागरुकता निर्माण होऊन, निश्चितच वाढत्या गुन्हयांचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. हयाच दृष्टिकोणातून श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे संकल्पना व मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, रिसर्च अँड टेक्नॉलाजी, चंद्रपूर येथे सायबर सुरक्षा आणि लैगिंक गुन्हयापासून बालकांचे संरक्षण पोक्सो कायद्या बाबत जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी विद्यार्थ्यांना, आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांनी आई-वडील पाल्य व शिक्षक वेळोवेळी करीत असलेल्या मार्गदर्शनानुसार जिवन जगावे व आपले लक्ष शिक्षणावर तसेच सकारात्मक विषयावर केंद्रीत करुन आपले स्वतःचे भविष्य उज्जवल करण्यावर लक्ष देवुन एक चांगला नागरीक म्हणुन आपली ओळख ठेवावी. तसेच मा. न्यायाधिश सुमीत जोशी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर हयांनी सर्वप्रथम भारताचे संविधान चे प्रास्ताविका उद्देशिका चे पठण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत वय १८ वर्षाचे आंतील कुणीही लैगिंक शोषण अत्याचारास बळी पळू नये, प्रसंगी शोषण अत्याचार घडत असल्यास त्वरीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची व पोलीसांची मदत घ्यावी असे आवाहन करुन विद्यार्थ्यांना “The Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act 2012" या कायद्याबाबत माहिती देवुन त्यांचे अधिकार व संरक्षण विषयक कायदेशीर बाबीवर तसेच स्पर्धा परिक्षाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सायबर हायजिन प्रॅक्टीशनर मुजावर अली, सायबर पो.स्टे. यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणादरम्यान इंटरनेट उतमोबाईलच्या केलेल्या दुरुपयोगाचे दुष्परिणाम बाबत घडलेल्या गुन्हयांचे उदाहरणे देवुन कॉलेज जिवनात मोबाईल तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून आपले जिवन कसे सफल करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
सदरचा जागरुकता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, रिसर्च अँड टेक्नॉलाजी, चंद्रपूर येथील प्राचार्य डॉ. जाफर खान सर आणि संस्थेचे उपाध्यक्ष श्री निनाद गड्डमवार तसेच प्रोफेसर निखील दुबे, अविनाश चल्लेलवार आणि इतर शिक्षक - शिक्षीका वृंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर येथील कार्यालयीन स्टॉफ यांच्या सह सदर कॉलेजचे ५०० वर विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि सायबर पोस्टे चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप एकाडे पाटील उपस्थित होते.