मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न..!

ऊल्हासनगर (जगदीश काशिकर) - डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माजी नगरसेविका जयश्री सुर्वे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी महापौर लीलाताई आशन, माजी नगरसेवक अरुण आशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या उपस्थितीत पार पडले या आरोग्य शिबिरात हृदयविकार किडणीस्टोन, कॅन्सर, नाक - कान - घसा तपासणी, नेत्र चिकित्सा, मोफत चश्मा वाटप, मोतीबिंदू तपासणी, जनरल ओपीडी या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी महापौर लीलाताई आशन, माजी नगरसेवक अरुण आशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख राम राऊत, रवींद्र ननवरे दीपक गवळी प्रसाद सूर्यराव ऋषिकेश देशमुख, तसेच शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम उपस्थित होती.
श्री मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.