पुण्यातील बिशपची संत तुकारामांवरील पीएचडी बोगस .!

 स्प्रऊट्स Exclusive ..!
पुणे (जगदीश काशिकर) - संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होते. या संत तुकारामांवर सध्याचे पुण्यातील बिशप थॉमस डाबरे यांनी पीएचडी केली होती. ही पीएचडी त्यांनी १९७९ साली पुणे येथील ज्ञानदीप विद्यापीठातून केली. मात्र ही पीएचडी बोगस आहे, अशी धक्कादायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आली आहे.
बिशप डाबरे यांनी ही पीएचडी ज्ञानदीप विद्यापीठातून केली. 'युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन'च्या (युजीसी ) नियमानुसार हे विद्यापीठ किंवा university  नाही. ही केवळ रजिस्टर्ड संस्था आहे. मात्र ही संस्था रजिस्टर करताना त्यांनी संस्थेच्या नावात 'युनिव्हर्सिटी' या शब्दाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे केवळ 'युनिव्हर्सिटी' या शब्दामुळे विद्यार्थी व पालकांची सातत्याने दिशाभूल होत आहे.
ज्ञानदीप युनिव्हर्सिटी - Jnana Deepa University ही संस्था आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या नियमानुसार कोणत्याही संस्थेला पीएचडी देण्याचा अधिकार नाही. तरीही महाराष्ट्रात अशा संस्था पीएचडी देत आहेत. मात्र 'युजीसी'चे वरिष्ठ अधिकारी, राज्यपाल कोश्यारी, त्यांचे बेकायदेशीरपणे बसलेले भ्रष्ट सचिव उल्हास मुणगेकर व राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. धनराज माने हे मूग गिळून गप्प आहेत. 
थॉमस बिशप हे वादग्रस्त बिशप आहेत. पुण्याचा लिंगपिसाट प्रिस्ट व्हिन्सेंट परेरा याने असंख्य वेळेला नाबालिक मुलांवर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात परेरा यांना दुसऱ्यांदा 'पॉस्को' लावण्यात आला. महत्वाचे म्हणजे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस व बिशप थॉमस डाबरे हे सहआरोपी आहेत.डाबरे यांनी बोगस पीएचडी मिळवून स्वतःचे पद्धतशीरपणे ब्रॅण्डिंग करवून घेत आहेत  व त्याद्वारे जनतेची सातत्याने दिशाभूल करीत आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".