सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंताला दोन लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केले..!
बल्लारपुर (का.प्र. ) - चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पूल बांधणीच्या कंत्राटदाराला 2 लाखाची मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अनिल शिंदे यांना 2 लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.तक्रारदार यांनी मागील वर्षी सप्टेंबर / आक्टोबर महिण्यामध्ये आर. सि. एल. डब्ल्यु. ई. या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत मुंगसाजी कॅन्स्ट्रक्शन कंपणी, यवतमाळ तर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका येथील पुल बांधणीचे कामे घेतलेली होती. सदर पुल बांधणीचे कामे तक्रारदार यांनी पुर्ण केलेले असुन केलेल्या पुल बांधणीच्या कामाचे निरीक्षण शिंदे यांचेकडून करण्यात आलेले होते.
तक्रारदार यांनी केलेल्या संपुर्ण कामाचे अंदाजे १ कोटी रूपयाचे एकुण ४ बिले असुन सदर ४ बिलांपैकी २ बिलं तयार करून मंजूर करणेकामी सार्वजनीक बांधकाम विभाग, चंद्रपूर येथे पाठविणेकरीता तसेच बिल मंजूर झाल्यानंतर उर्वरित २ बिलं तयार करून मंजूरीकरीता पाठविण्याच्या कामाकरीता शिंदे यांनी २ लाख रूपये लाच रक्कमेची मागणी केली. परंतु तकारदार यांची अनिल जगन्नाथ शिंदे, कनिष्ठ अभियंता ( वर्ग २ ) सार्वजनीक बांधकाम उपविभाग, जिवती, ता. जिवती, जि. चंद्रपूर यांना २ लाख रूपये लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांचे विरुध्द लाप्रवि कार्यालय चंद्रपूर येथे दि. ०७/०६/२०२२ रोजी तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीवरून दिनांक. ०८/०६/२०२२ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये तक्रारदार यांचेकडे २ लाख रू. ची मागणी करून तक्रारदार यांचे बिल मंजूर झाल्यानंतर स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाले.
त्यावरून आज दि. ०१/११/२०२२ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान कनिष्ठ अभियंता अनिल जगन्नाथ शिंदे, यांनी पंचासमक्ष लाचरक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.सदर कार्यवाही विशाल गायकवाड, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपुर, श्री.मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्री.अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर, पो.नि. शिल्पा भरडे तसेच कार्यालयीन स्टॉफ सफौ. रमेश दुपारे, नापोकॉ. रोशन चांदेकर, नरेशकुमार नन्नावरे, पोकॉ. रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, मपोकॉ. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे व चापोका हाके यांनी यशस्वी पार पाडली आहे.यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.