राज्‍यस्‍तरीय उपवधू-उपवर परिचय मेळावा संपन्‍न..!

गोलकर समाजाचा विकास करण्‍याकरिता केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजना समाजापर्यंत पोहचवूया – श्री. सुधीर मुनगंटीवार
गोला गोलकर (यादव) समाज संघटना चंद्रपूर द्वारा आयोजित राज्‍यस्‍तरीय उपवधू-उपवर परिचय मेळावा संपन्‍न..!
बल्लारपुर (का.प्र.) - गोला गोलकर (यादव) समाज संपूर्ण राज्‍यात कानाकोप-यात विविध ठिकाणी विखुरलेला आहे. त्‍यामुळे राज्‍यातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येवून वैचारीक देवाण-घेवाण तसेच ऋणानुबंध निर्माण करण्‍याकरिता व समाजाचा सर्वांगिण विकास करण्‍याकरिता एकत्र येणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. या समाजाच्‍या सर्व मागण्‍या पूर्ण करण्‍याचा मी पूर्ण शक्‍तीनिशी प्रयत्‍न करून समाजाच्‍या पाठीशी उभा आहे. समाजाचा विकास करण्‍याकरिता केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजना समाजापर्यंत पोहचवूया, असे प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक ३० ऑक्‍टोंबर रोजी राजीव गांधी कामगार भवन येथे आयोजित गोला गोलकर (यादव) समाज संघटना चंद्रपूरद्वारा आयोजित राज्‍यस्‍तरीय उपवधू-उपवर परिचय मेळाव्‍यात श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, मानववंशशास्त्राच्‍या दृष्‍टीकोणातुन व ऐतिहासिक, भौगोलिकदृष्‍टया सुध्‍दा अतिशय महत्‍वाचा असा गोला, गोलाकार (यादव) समाज आहे. या समाजाचा सांस्‍कृतीक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. या समाजाच्‍या मी कायम पाठीशी आहे. समाजाच्‍या उन्‍नतीकरिता समाजातील शिक्षण घेवून यशस्‍वी झालेल्‍या व्‍यक्‍तींनी स्‍वतःसाठी ९० टक्‍के व समाजासाठी १० टक्‍के काम करावे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्‍यांना शुभेच्‍छा देत समाजाची, जिल्‍हयाची, देशाची शान वाढवा व समाज धनसंपन्‍न करण्‍यापेक्षा गुणसंपन्‍न करा असेही ते म्‍हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष गणपतराव बुर्रीवार, प्रमुख अतिथी रविकिरण यादव, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, नामदेवराव आयलवाड, श्रीराम गालेवाड, क्रिष्‍णा यादव, मनोहर बोदलवार, पुरूषोत्‍तम कोमलवार, भास्‍कर बहिरवार, साईनाथ अद्दलवार, संतोष मंथनवार, सोमेश्‍वर पालेवार, अजय मेकलवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती. यावेळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनी आदी उपस्थिती होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.