भाजपाच्‍या विकासाभिमुख कार्यशैलीवर जनसामान्‍यांचा विश्‍वास –ना. सुधीर मुनगंटीवार

जिवती तालुक्‍यातील गुडशेला, चिखली खुर्द, पाटागुडा, कामातगुडा येथील कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्‍या शेकडों कार्यकर्त्‍यांचा भाजपामध्‍ये प्रवेश...!
बल्लारपुर (का.प्र.) - जिवती तालुक्‍यातील गुडशेला, चिखली खुर्द, पाटागुडा, कामातगुडा येथील कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्‍या शेकडों कार्यकर्त्‍यांचा भाजपामध्‍ये प्रवेश घेतला तो भाजपाच्‍या विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्‍वास ठेवून. ज्‍या विश्‍वासाने त्‍यांनी भाजपात प्रवेश घेतला त्‍या विश्‍वासाला आम्‍ही कधिही तडा जावू देणार नाही अशी ग्‍वाही वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दिनांक ३० ऑक्‍टोबर रोजी विश्रामगृह चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत जिवती तालुक्‍यातील गुडशेला, चिखली खुर्द, पाटागुडा, कामातगुडा येथील कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्‍या शेकडों कार्यकर्त्‍यांचा भाजपामध्‍ये प्रवेश घेतला. यावेळी प्रामुख्‍याने भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी उपसभापती महेश देवकाते यांची उपस्थिती होती. यावेळी शिवनाथ पाटील सुरणर,अंबादास कंचकटले, रमाकांत जंगापल्ले,आनंद पवार, गणेश कांबळे, गणेश हरगिले, चांद्रमानी वाघमारे, राजू राजपांगे, पंढरी ढगे, फकरू नैताम, नरसिंग कोलगिर, उत्तम कंचकटले, लक्ष्मण भोईनवाड, गोविंद दूबले,प्रभू तोगरे, श्रीमती.वानाबाई गायकवाड,त्यावेळी भाजपा चे खालील कार्यकर्ते उपस्थित होते उद्धव परकड ,तानाजी कांबळे, भानदास तोगरे, सरपंच जलपत मडावी, चंद्रभान केदासे, राजू घोटमुखळे,विजय गोतावले, भारत चव्हाण,प्रेमसिंग राठोड या कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी भाजपात प्रवेश घेत भाजपावर विश्‍वास दर्शविला. नवप्रवेशित सर्वांचे श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी स्‍वागत केले व शुभेच्‍छा दिल्‍यात.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.