शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ जिल्ह्यात अव्वल.!

विभागीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व.!
भद्रावती (ता. प्र.) - जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे झालेल्या 19 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील मुलींच्या संघाने सगळ्या संघांवर मात करून जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. नागपूर विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये हा मुलींचा संघ चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे सुरू आहेत. यात 19 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या कबड्डी संघात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील मुलींच्या संघाने शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सगळ्या संघांवर मात करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे . नागपूर विभागीय स्पर्धेसाठी हा संघ चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. यशवंतराव शिंदे क.महा.भद्रावती या महाविद्यालयाने चंद्रपूर जिल्ह्यात शालेय शैक्षणीक प्रगती सोबतच क्रिडा क्षेत्रात तसेच सांस्कृतीक क्षेत्रात नाव लौकीक प्राप्त केले आहे. क्रिडा क्षेत्रात जिल्हास्तरावर प्रथम आल्याने व विभागीय स्तरावर निवड झाल्याने विजयी खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे , सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे , प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , डॉ. ज्ञानेश हटवार, प्राध्यापक रमेश चव्हाण, किशोर ढोक, माधव केंद्रे, नरेश जांभूळकर , सौ.उज्ज्वला वानखेडे, संगीता जक्कूलवार समस्त प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे . विभाग स्तरीय होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघात वैष्णवी मेश्राम, वैष्णवी वाटेकर, वैष्णवी उईके, साक्षी मत्ते , विश्रांती मगरे, मयुरी ठमके, प्रगती श्रीरामे, पायल बदकी, दिव्या घुमे, ज्ञानेश्वरी भोयर, ऋतुजा खापणे, आरती पासवान या खेळाडूंनी आपले उत्तम प्रदर्शन दाखविले . जिल्ह्यात प्रथम आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.