नागपूर विभागीय ग्रंथालय संघाचे अधिवेशन सावलीत संपन्न.!

सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती मिळविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : डॉ.गजानन कोटेवार
भद्रावती (ता. प्र.) - जयभिम सार्व. वाचनालय सावली च्या अमृत महोत्सवा निमित्य नागपूर विभागीय ग्रंथालय संघ , चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघ, जय भीम वाचनालय सावली यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभागीय ग्रंथालय संघाचे अधिवेशन जय भीम वाचनालय सावली येथे नुकतेच संपन्न झाले . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. गजानन कोटेवार,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून दत्तात्रय क्षीरसागर साहेब, संचालक ग्रंथालय महाराष्ट्र शासन मुंबई हे उपस्थित होते. या अधिवेशनाला अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. गजानन कोटेवार यांनी "सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या ग्रंथपालांना सेवासार्ति प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार' नाही असे सांगितले.
जय भीम वाचनालय सावलीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रमाबाई आंबेडकर विद्यालय व क.महा. सावली येथे आयोजित विभागीय ग्रंथालय अधिवेशन नुकतेच पार पडले .
या विभागीय ग्रंथालय अधिवेशनाच्या कार्यक्रमात उद्घाटक माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार, अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार, अध्यक्ष महाराष्ट्र ग्रंथालय संघ, ग्रंथालयाचे संचालक दत्तात्रय क्षीरसागर साहेब, विभागीय उपसंचालक मिनाक्षी कांबळे मॅडम, सर्व जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, भाऊराव पत्रे, नगराध्यक्ष लता लाडके, संदीप गड्डमवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विभागीय ग्रंथालय अधिवेशनात उद्घाटन प्रसंगी आमदार वडेट्टीवार यांनी "ग्रंथालय हे मानवाला घडविण्यासाठी बौध्दिक खाद्य पुरवून व्यक्तीमत्व घडवतात, मात्र येथिल कर्मचारी हा अत्यल्प मानधनावर काम करत आहे, हि शोकांतिका आहे" असे सांगितले. प्रमुख मार्गदर्शन करताना संचालक दत्तात्रय क्षिरसागर साहेब यांनी ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा सहानुभूती पूर्वक विचार करण्यात येईल, आपणही आपल्या अधिकारांसोबत कर्तव्याकडे लक्ष देऊन तंत्रप्रेमी व्हावे, असे आवाहन केले. या वेळी दैनंदिन वाचकांचा तसेच माजी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी विभागातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जय भीम वाचनालयाचा संपूर्ण संचालक मंडळ, ग्रंथपाल, जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. जानेवारी महिन्यात शेगाव येथे होणाऱ्या राज्य ग्रंथालय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.